esakal | या खेडेगावात साकारले चिल्ड्रन हेल्थ पार्क
sakal

बोलून बातमी शोधा

karad

बनवडी ग्रामपंचायतीच्या दहा गुंठे जागेत उभारण्यात आलेला हा सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला पार्क आहे. त्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्यासह व्यायामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. 

या खेडेगावात साकारले चिल्ड्रन हेल्थ पार्क

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) ः बनवडी ग्रामपंचायत आणि लायन्स क्‍लब ऑफ कऱ्हाडच्या वतीने उभारण्यात आलेल्या लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्‌घाटन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या हस्ते झाले. बाळगोपाळांसाठी मौजमजा असलेला हा जिल्ह्यातील पहिलाच पार्क ठरला आहे. 

बनवडी ग्रामपंचायतीच्या दहा गुंठे जागेत उभारण्यात आलेला हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला पार्क आहे. त्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्यासह व्यायामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. मुलांसाठी झोपाळा, सायकलिंग, घसरगुंडी, फिरता पाळणा, उंच झोका, फिरते चक्र, वजनाचा समतोल काटा आदींसह साहित्याचा समावेश आहे. तो परिसर तारांच्या कुंपनाने बंदिस्त करण्यात आला आहे. देखरेख करण्यासाठी कर्मचारी ठेवण्यात येणार आहे. उद्‌घाटनप्रसंगी माजी प्रांतपाल बाबासाहेब पवार, कऱ्हाड उत्तर सरपंच परिषदेचे अध्यक्ष शंकरराव खापे, बनवडीच्या सरपंच उषा कारंडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, उपसरपंच हरुण नाईक, पार्कचे जिल्हाध्यक्ष बी. एम. पाटील, झोनल अध्यक्ष मावजी पटेल, डॉ. उमेश पवार, मिलिंद भंडारे, खंडू इंगळे, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ थोरात, अमृता भंडारी, सुशांत व्हावळ, लक्ष्मण यादव उपस्थित होते. 

शंकरराव खापे म्हणाले, ""हेल्थ पार्कमुळे बनवडीच्या वैभवात भर पडली आहे. खेळाबरोबर मुलांचा तेथे व्यायामही होणार असल्याचे तो बालकांसाठी औत्सुकतेचा विषय ठरला आहे. बनवडी ग्रामपंचायत नेहमीच वेगळा उपक्रम राबवते. मात्र, लायन्स क्‍लबच्या वतीने उभारण्यात आलेल्या या चिल्ड्रन हेल्थ पार्कला बनवडीकर कधीही विसरणार नाहीत.'' 

संपादन ः संजय साळुंखे 
 

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद 

loading image
go to top