ज्येष्ठांना श्वास देण्यासाठी साळशिरंबेकर एकवटले

जगन्नाथ माळी
Wednesday, 16 September 2020

ऑक्‍सिजनशिवाय कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी साळशिरंबेतील नागरिक एकवटले आहेत. गावकऱ्यांनी पोर्टेबल ऑक्‍सिजन किट आणून ज्येष्ठांना जणू नवसंजीवनीच दिली आहे. 

उंडाळे ः कोरोनासारख्या महामारीच्या विळख्याने गावागावांत आता ऑक्‍सिजन किट यंत्रणा उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना ऑक्‍सिजनची गरज आहे. त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा ऑक्‍सिजन पुरवून त्यांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न होताना दिसताहेत. असाच प्रयत्न परिसरातील साळशिरंबेतही होत आहे. ऑक्‍सिजनशिवाय कोणाचा जीव गमवावा लागू नये, यासाठी तेथे अख्खा गाव एकवटला आहे. त्यांनी पोर्टेबल ऑक्‍सिजन किट आणून गावातील ज्येष्ठांना जणू नवसंजीवनीच दिली आहे. 

तालुक्‍यात कोरोना रुग्णांचा वाढत्या वेगाने ग्रामीण भागालाही विळखा घातला आहे. सध्या दवाखान्यात बेड मिळेत नाहीत. या पार्श्वभूमीवर साळशिरंबे गाव एकवटले आहे. गावाने एकत्र येऊन ऑक्‍सिजन मशिन खरेदी करत ते रुग्णसेवेत रुजू केली आहे. या निमित्ताने गावाने राबवलेले उपक्रम अनेकांना नवसंजीवनी देणारा आहे. साळशिंरबे ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते, युवक, गणेश मंडळे, पुणे, मुंबईस्थित युवकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून ऑक्‍सिजन किट, टेंपरेचर गन, ऑक्‍सिमीटर आदी साहित्य खरेदी करून आरोग्य विभागाकडे देण्यात आले आहे. ग्रामस्थांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे. 

सध्या प्रत्येक ठिकाणी कोरोना विषाणू संक्रमण गतीने होत आहे. अशा कठीण काळात गावातील रुग्णांना ऑक्‍सिजन मिळावा, यासाठी साळशिंरबे ग्रामस्थांनी खरेदी केलेल्या ऑक्‍सिजन किटचा रुग्णांना फायदा होणार आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 
 

साताऱ्यात एक हजारावर गावांना कोरोनाचा विळखा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Salshirambekar gathered to give breath to the elders