Satara : ‘सर्ज्या’ची शर्यत थांबली...

सर्वत्र हळहळ; वीज कोसळून हरहुन्नरी बैलाचा मृत्यू
Satara
Satarasakal

नागठाणे : वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या, किती तरी शर्यती जिंकणाऱ्या, सिनेमातही भाव खावून जाणाऱ्या ‘सर्ज्या’ची धाव अखेर कायमची थांबली. सध्याच्या अवकाळी पावसात अंगावर वीज कोसळून या हरहुन्नरी बैलाचा प्रवास थांबला, तो आता कायमचा. त्याच्या या दर्दैवी मृत्यूने सारेच हळहळले.

''सर्ज्या''ची ही कहाणी सर्वांनाच चटका लावणारी. माणूस अन् प्राणी यांच्या नात्यातील गहिरेपण समाजासमोर आणणारी. सातारा तालुक्यातील निसराळे येथील सुनील गायकवाड यांच्या मालकीचा हा बैल. त्याचा परिसरात चांगलाच बोलबाला होता. अनेक शर्यतींत त्याने यश संपादन केले होते. ''शर्यत'' नावाच्या सिनेमातही तो चमकला होता.

गायकवाड कुटुंबासाठी तर तो जीव की प्राण होता. परवाच्या अवकाळी पावसाने या सर्ज्याचा घात केला. बेंद नावाच्या शिवारात गवत चारण्यासाठी त्याला सोडले होते. अशातच मुसळधार पाऊस अन् विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. काही कळायच्या आतच कोसळत्या विजेने सर्ज्यावर घाला घातला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा जोडीदार असलेला ''पोपट'' सुदैवाने बचावला. तलाठी गोरख कुंभार, पोलिस पाटील नीलम घोरपडे, सरपंच नारायण खामकर, माजी सरपंच राहुल गायकवाड, सुरेश घोरपडे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

‘सर्ज्या’ हा जणू आमच्या कुटुंबातीलच एक घटक होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा त्याच्यावर जीव होता. त्याचे सोडून जाणे आम्हा सर्वांसाठी वेदनादायी आहे.

-सुनील गायकवाड, निसराळे, ता. सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com