
सातारा : उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कोल्हापूर शैक्षणिक विभागाने असाक्षर नोंदणी आणि साक्षरता परीक्षेत लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे. या परीक्षेत राज्याचा निकाल ९८.७५ टक्के लागला आहे. यात कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.६३ टक्के लागला असून, सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे.