शिवेंद्रसिंहराजे संतापले, सातार्‍यात आधीच अडचणी आहेत त्यात...

शिवेंद्रसिंहराजे संतापले, सातार्‍यात आधीच अडचणी आहेत त्यात...

सातारा : सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून सातार्‍यातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत असताना पुण्यातील जैविक कचरा सातारा पालिकेच्या कचरा डेपोत आणला जातो आणि सातारकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होतो, ही मोठी चिंताजनक आणि संतापजनक बाब आहे. सातारकरांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सातारकरांच्या अडचणीत भर टाकण्याचा प्रकार कोणी करु नये, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हणतात , सातार्‍यातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. असे असताना पुणे महानगर पालिकेतील जैविक कचर्‍याचे दोन डंपर सातारा कचरा डेपोत येतात. सोनगांव कचरा डेपोत दिवसाला १०० किलो विघटन क्षमता असताना तब्बल चार ते पाच टन जैविक कचरा सातार्‍यात आणला जातो, ही बाब अत्यंत चुकीची आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. सातारा पालिका प्रशासनाने हा प्रकार का केला? याबाबत नगराध्यक्षा, उपाध्यक्ष यांना तरी माहिती आहे का? मुखयाधिकार्‍यांनी मनमानी कारभार करुन नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. पुण्यातल्या जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी- चिंचवड, लोणावळा अथवा अन्य नजीकच्या पालिका आहेत. हा कचरा सातार्‍यात आला कसा? यासाठी पालिकेने परवानगी दिली होती का? मुख्याधिकार्‍यांनी यासाठी परवानगी दिली कशी? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

सातारा शहरानजीकची उपनगरे, काही गावांतील कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी पालिका आडकाठी आणत असते. पुण्यातील धोकादायक जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये येतो आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो, ही बाब गंभीर आहे. कोणीही काहीही टाकावे यासाठी सातारा हे डंपींग ग्राऊंड आहे काय? असा संतापजनक प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे. सातार्‍यात आधीच अडचणी आहेत त्यात भर टाकण्याचा हा प्रकार आहे. कोरोनामुळे भितीचे वातावरण असताना जैविक कचरा आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातारकरांसह आसपासच्या गावातील लोकांना धोका होवू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. पालिका प्रशासनाने तातडीने हा प्रकार थांबवून सातारकरांच्या आरोग्याबाबत सतर्क रहावे, अशी सुचना शिवेंद्रसिंहराजेंनी केली आहे.

दहावीनंतर काय? विनामुल्य वेबिनारचे आयोजन  

...म्हणून पुण्यातील जैव वैद्यकीय कचरा साताऱ्यात आणला जाताेय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com