Satara : शिवसागर जलाशयात बुडून एकाचा मृत्यू

एका झाडाखाली स्वयपाकाचे साहित्य मांडून नदीच्या किनारी सर्व जन होते
बुडून एकाचा मृत्यू
बुडून एकाचा मृत्यूSakal

कास : शिवसागर जलाशयात म्हावशी ता. जावळी हद्दीमध्ये सायंकाळी ७ च्या सुमारास शिवसागर जलाशयात बुडून एकाचा मृत्यू झाला. संकेत संग्राम काळे वय 27 वर्ष रा. रेठरे वाठार तालुका कराड या पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की म्हावशी ता. जावळी हद्दीतील शिवसागर जलाशयालगत असलेल्या एका टेंट कॅम्पिंग वर काही पर्यटक पर्यटनासाठी आले होते.

एका झाडाखाली स्वयपाकाचे साहित्य मांडून नदीच्या किनारी सर्व जन होते. तरीही हा युवक नेमका कसा बुडाला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी असून सकाळपासून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

घटनेबाबत उलटसुलट चर्चा...

हा युवक नेमका कसा बुडाला याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा युवक पाण्यात पोहायला गेला आणि बुडाला असे सांगितले जात आहे तर काही जन सदर घटनास्थळ परिसरात एक टेंट हाऊस असून या टेंट हाऊस वर हे पर्यटक आले होते. टेंट हाऊस वर असलेल्या वाॅटर स्कूटर बोटवरून पाण्यात सैर करताना स्कूटर बोट पलटी होऊन हा युवक पाण्यात बुडाला असे बोलले जात आहे. त्यामुळे ह्या घटनेच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनासमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com