चला खेळूया : छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात काय सुरू, काय बंद वाचा

चला खेळूया : छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात काय सुरू, काय बंद वाचा

सातारा : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेल्या सातारा शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. प्राथमिक टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे क्रीडा संकुलातील मैदानांवर समुह विरहित, सामाजिक अंतर राखून शारीरिक व्यायाम व इतर खेळ खेळण्यास परवानगी असल्याचे जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी  स्पष्ट केले.

छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल सकाळी सहा ते नऊ आणि दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत खूले राहील. प्राथमिक टप्प्यात नागरिकांसाठी मुख्य मैदान, बास्केटबाॅल मैदान, लाॅन टेनिस मैदान हे सुरु राहील. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलातील व्यायामशाळा (जिम), जलतरण तलाव, बाॅक्सिंग, याेगा हाॅल, बॅडमिंटन हाॅल व अन्य सर्व अंतर्गत हाॅल व्यायामासाठी तूर्तास बंद राहतील. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी क्रीडा संकूलाच्या प्रवेशदारानजीक सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडू, नागरिकांनी क्रीडा विषयक व्यायाम करताना जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास ते तात्काळ बंद करण्यात येईल असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.

दरम्यान छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात काेणत्याही प्रकाराचा सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम करता येणार नाहीत. तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, दहा वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे. त्यांना घरा बाहेर पडण्यास प्रतिबंध राहण्याचे आदेश असल्याने संबंधित नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात सरावासाठी येणारे खेळाडू, सर्व नागरिकांनी त्यांच्या माेबाईलमध्ये आरोगय सेतू या ॲपचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर पाचशे रुपयांचा दंड तसेच सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून थुंकल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतात. तरी खेळाडूंनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे व कटू कारवाई टाळावी असे आवाहन नाईक यांनी केली आहे.

जगापासून लपण्यासाठी गेली लॉजच्या आश्रयाला... आता न्यायालयात माराव्या लागणार जोडीने चकरा

खासदार श्रीनिवास पाटलांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना धाडले पत्र

विद्यार्थी, पालकहाे वह्या, पुस्तक घेण्यापुर्वी हे वाचा

कोरोनापाठोपाठ आता घोंघावतोय नवा धोका...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com