Satara News: महामार्गावरील वाहतूक काेंडी लांबणारच! शेतकरी संघटनांचा कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम... अन्यथा जिल्हा बंद

Sugarcane Price Protest Continues on Nagthane Highway: साताऱ्यात ऊसदर आंदोलन पेटणार? दोन दिवसांत दर जाहीर करा, अन्यथा जिल्हा बंदचा इशारा
Satara Farmers Protest Sugarcane Price Demand Clear FRP and Extra Rate Within Two Days or Face Districtwide Shutdown

Satara Farmers Protest Sugarcane Price Demand Clear FRP and Extra Rate Within Two Days or Face Districtwide Shutdown

esakal

Updated on: 

सातारा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि योग्य दर मिळावा, या मागणीसाठी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नागठाणे येथे सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत ऊसदराचा कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे नागठाणे येथील रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतला. महामार्गावरील वाहतूक काेंडीत भर पडत आहे. त्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता ही या बैठकीने मावळत आहे. त्यामुळे एेनदिवाळीत सामान्यांचा शिमगा सुरुच रहाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...