सातारा : पुरवठा अधिकाऱ्यांचे वाहन चोरीला; सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर

The bike stolen
The bike stolensakal

सातारा : जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांना शासनाकडून दिलेले चारचाकी वाहन त्यांच्या निवासस्थानाच्या पार्किंगमधून चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या ‘वर्ग एक’च्या अधिकाऱ्यांचे वाहनच चोरट्यांनी गायब केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे साताऱ्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

The bike stolen
केंद्राकडून दिवाळी गिफ्ट; पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त

याबाबत सातारा- कोरेगाव रस्त्यावर शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. एकाच परिसरात ‘तक्षशिला’ आणि ‘नालंदा’ ही दोन अपार्टमेंट असून, येथे वर्ग एकच्या दर्जाचे अधिकारी राहतात. ‘नालंदा’मध्ये जिल्हापुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते राहतात. त्यांना जिल्हाभरात पुरवठा विभागाच्या अनुषंगाने दौरे करता यावेत, म्हणून प्रशासनाने गाडी (एमएच ११ एबी १६६) दिली असून, त्या गाडीवर पुढे ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहले आहे. या गाडीवर चंद्रकांत हिंदूराव पवार (रा. पवाराची निगडी, ता. सातारा) हे चालक आहेत. या प्रकरणाची तक्रार वाहन चालकांनी शहर पोलिस ठाण्यात दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आनेवाडी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता ही चारचाकी तेथून पुढे गेली असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत. दरम्यान, शासकीय निवासस्थान असलेल्या ‘तक्षशिला’ आणि ‘नालंदा’ या दोन्ही अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही नसल्याचीही माहिती पुढे आली आहे. या दोन्ही अपार्टमेंटला सुरक्षेसाठी गेटही नसल्याचे दिसून आले आहे.

‘‘चारचाकी वाहन सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या खालील पार्किंगमध्ये लावून वाहनचालक घरी गेले होते. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ते आले असता त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी सुमो गाडी दिसून आली नाही. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.’’

- स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हापुरवठा अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com