
पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात संघटनेचे तीनच पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
सातारा : किसर वीर कारखान्याच्या थकीत ऊसबिल वसुलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर नुकतेच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनभाऊ साळुंखे, तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल बरं?
यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले, की किसन वीर कारखान्याच्या व्यवस्थापनाने 30 ऑगस्टपर्यंत उसाचे उर्वरित बिल देणार असल्याचे संघटनेला लेखी दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत थकीत ऊसबिल न दिल्याने लेखी दिलेली मुदत संपली आहे.
सत्तेत नसतानाही करुन दाखवलं, आता पुढची रणनीतीही ठरली : शिवेंद्रसिंहराजे
शेतकऱ्यांचे जवळपास 35 कोटी रक्कम कारखान्याकडे थकीत आहे. सहा ते सात महिने झाले, तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या घराच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात संघटनेचे तीनच पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
भारीच! उंडाळे पंचायत रुग्णांना देणार मोफत ऑक्सिजन
Edited By : Siddharth Latkar