सातारा : मालखेडला पोत्यात युवकाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : मालखेडला पोत्यात युवकाचा मृतदेह

कऱ्हाड : युवकाचा मृतदेह पोत्यात बांधून नदी पात्रात टाकलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे. मालखेडच्या हद्दीतील दक्षिण मांड नदी पात्रात आज दुपारी घटना उघडकीस आली. संबंधिताचा खून करून त्याला पोत्यात बांधून नदीत टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मालखडेच्या मारुती घाट परिसरात नदीतून वाहत आलेल्या पोत्यात तेथील ग्रामस्थांना मृतदेह दिसला. त्यांनी त्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांकडून त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी सांगितले की, पुरुषाचा मृतदेह पोत्यात आहे. तो नदीतून वाहून आला आहे, त्याची माहिती पोलिस पाटील यांनी पोलिसांना दिली. घटना संशयास्पद असल्याने त्वरित पोलिस दाखल झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाटे, उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, सहायक निरीक्षक रेखा दुधभाते, भरत पाटील, एस. आय. जाधव, हवालदार धनंजय कोळी, सज्जन जगताप, विजय म्हेत्रे, शशिकांत घाडगे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ व मृतदेहाची स्थिती पाहून पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा: Pune: कार्ल्यात पार्टीवर पोलिसांचा छापा; १७ जणांना अटक

त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते. त्यानंतर संबंधिताचा नक्की कशामुळे मृत्यू झाला ते स्पष्ट होईल, तरीही खुनाची शक्यता गृहीत धरून पोलिसांची पथके तपासाला रवाना झाली आहेत. त्याच्या अंगावर असलेल्या शर्टवरूनही पोलिस तपास करत आहेत. कपड्यासह अन्य काही बाबींवरून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. प्रथमदर्शनी खूनच असावा, अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

loading image
go to top