esakal | सातारा : जिल्ह्याला मिळाले 51 हजार डोस Satara
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : जिल्ह्याला मिळाले 51 हजार डोस

sakal_logo
By
प्रशांत घाडगे -@ghadgepd

सातारा : राज्यभरात लसीकरण मोहिमेत सातारा (Satara) जिल्हा अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यात आज कोव्हिशिल्ड (Covishield) ३६ हजार, तर कोव्हॅक्सिनचे (covaxin) १५ हजार ३६० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शुक्रवार मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) होणार आहे. या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्याही ३०० हून अधिक ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यात एक जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरवातीच्या तीन ते चार महिन्यांत लशीचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध होत होते. त्यानंतर लशींचे डोस कमी येण्यास सुरवात झाल्याने मोहीम मंदावली होती. मात्र, मागील पाच महिन्यांपासून लशींची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग येत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक एक लाख ४७ हजार लस जिल्ह्याला उपलब्ध झाली होती. त्यानंतर जिल्ह्याला आज ५० हजारांहून अधिक लशींचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्राकडून राज्याला लशीचे डोस जादा प्रमाणात उपलब्ध झाल्याने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई व कोरेगाव या पाच शहरांत ऑनलाइन नोंदणीनुसार व ऑफलाइनही टोकन पद्धतीने लसीकरण प्रक्रिया होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: भाजपकडून आंबोट गावामध्ये कोविड लसीकरण शिबिर

‘‘गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याला लशींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली असून, पुढील काळातही जिल्ह्याला जास्तीतजास्त लशींचे डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

- डॉ. प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग

loading image
go to top