esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या पिढींची कर्मवीर अण्णांच्या रयत सोबतची अशीही बांधिलकी

काले : तिसऱ्या पिढींची कर्मवीर अण्णांच्या रयत सोबतची अशीही बांधिलकी

sakal_logo
By
सचिन मोहिते

हेही वाचा: Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

काले : पीठ नाही म्हणून आज अखेर तेथील विद्यार्थ्यांवर कधीच उपाशी राहण्याची वेळ आली नाही. कधी धान्य नसेल त्यादिवशी स्वतःच्या घरातील धान्य दळून विद्यार्थ्यांना दिले आहे. काले येथील कुलकर्णी- कुंभारगावकर कुटुंबियांनी तिसऱ्या पिढीपर्यंत ही सामाजिक भावना जपली आहे. कर्मवीर अण्णांच्या संस्थेचा उद्या (सोमवारी) १०२ वा वर्धापन दिन आहे, त्या निमित्त कुलकर्णी कुटूबियांच्या निस्वार्थी वृत्ती व प्रामाणिक सेवेची रयतनेही दखल घेण्याची आहे. निस्वार्थीपणे रसतच्या वसीतगृहाला तीन पिढ्यांपासून दान्य मोफत दळून देण्याचे कार्य आदर्शवत आहे.

येथील (कै.)गोपाळ कृष्णाजी कुलकर्णी यांच्या वडिलांनी १९३७ साली येथे पिठाची गिरणी सुरू केली. त्यावेळी कऱ्हाड तालुक्यात चळवळीचा जोर होता. सत्यशोधक समाज चळवळ प्रथम या गावातून सुरू झाली. गिरणीत काम करता करता चळवळीचे संस्कार त्यांच्यावर रुजले. त्याच काळात काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

हेही वाचा: मुलानं सेक्स करावा, ड्रग्जही घ्यावं; शाहरुखने 24 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य

पहिले वसतिगृह सुरू झाले होते. गिरणीत काम करताना वसतिगृहातील दोन विद्यार्थी धान्य दळून नेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली. त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड पाहून त्यांच्या मनात समाजाविषयी जाणीव झाली त्यांनी मुलांना मोफत धान्य दळून देण्याचे ठरवले. आज अखेर मोफत धान्य दळून देण्याचा त्यांचा वारसा जपला आहे. गोपाळ दादा यांच्यानंतर त्यांची दोन मुले हरिभाऊ (यशवंत) व विनायक कुलकर्णी यांनी ते कार्य चालू ठेवले आहे. त्यांचाच वारसा त्यांची दोन मुले सत्यजित व सौरभ यांनी पुढे चालू ठेवला आहे. संस्थेच्या पहिल्या वसतिगृहात येथे चोवीस विद्यार्थी शिक्षण घेतात.

सणासुदीला लागणारे धान्य गिरणीतून मोफत दळले जाते. धान्य दळून देताना वीज पुरवठा खंडित असेल तर कुलकर्णी कुटुंबीय जिथे लाईट उपलब्ध असेल तेथून त्यांना दळून आणून देतात. समाजातील इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल व समाजाभिमुख नवीन पिढी निर्माण होईल. त्यासाठी कुटुंबीयांचा योग्य सन्मान व्हावा हीच अपेक्षा आजी माजी रयत प्रेमी व कर्मवीर आण्णा प्रेमी यांची आहे.

वडिलांची शिकवण हीच शिदोरी आहे. आणांच्या कार्याला हातभार लागतो आहे, हीच यात समाधान आहे. तोच वारसा पुढच्या पिढीवर करत आहोत. मुलांच्या शिक्षणासाठी अण्णांनी त्याग केला. ते कायम आठवणीत ठेऊन आम्ही कुटूंबीय त्या कार्यात खारीचा वाटा उचलत आहे.

- हरिभाऊ कुलकर्णी

loading image
go to top