
सातारा : सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. या विकसनामध्ये पर्यटन स्थळांच्या ठिकाणी व्यवसाय उभारण्याची संधी महिला बचत गट, स्थानिक नागरिकांसह इतरांना देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनाच्या स्थळी येत्या वर्षभरात एक हजार लोकांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.