
सातारा: सातारा शहर परिसरात होणाऱ्या आयटी पार्कच्या नियोजित दोन्ही जागा विकसित केल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर ही जागा उद्योग विभागाकडे हस्तांतरित होईल. गोडोलीतील जागेत कन्व्हेन्शन सेंटर विकसित होणार असून, त्यामध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची सुविधा असेल. लिंबखिंड येथील ४२ हेक्टर जागा एमआयडीसीकडून विकसित करून तेथे आयटी कंपन्या उभारल्या जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वत: लक्ष ठेऊन पाठपुरावा करत आहेत.