नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पोलिसांकडून 19 लाखांची वसुली

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पोलिसांकडून 19 लाखांची वसुली

सातारा : शहरात बहुतांश वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारत वाहतूक पोलिसांनी मागील महिनाभरात सुमारे 8 हजार 747 वाहनांवर कारवाई करत 19 लाख 79 हजार 100 रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आवश्‍यक कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. 

शहर व परिसरात अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या रिक्षा, चौकाचौकात सुसाट वाहने चालवित फिरणारी तरुणाई, जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे पादचारी अशी परिस्थिती शहरात दिसत आहे. शहरातील वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत वाहने चालविताना दिसत असल्याने अपघातांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेत वाहनचालकांवर चाप बसविण्यास सुरवात केली आहे. 

शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत वाहने उभी असल्याचे दिसत आहेत. याचबरोबर नो एन्ट्री, लायसन्स, वाहन परवाना, फॅन्सी नंबर प्लेट, इन्शुरन्ससह इतर सर्व वाहनांची कागदपत्रे नसणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहेत. शिवाजी सर्कल, मोती चौक, बस स्थानक परिसर, जिल्हा परिषद चौक आदी वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिस कारवाई करत आहेत. तसेच, शनिवार व रविवार या दोन दिवसांत बाहेरून फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांनी वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावी, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही वाहतूक विभागाने सांगितले आहे. 

ऍपमध्ये कागदपत्रे अपलोड करावीत 
वाहनचालकांच्या सोईसाठी परिवहन विभागाने "डी.जी. लॉकर व एम.परिवहन' ऍप सुरू केले आहे. या ऍपमध्ये वाहनांची सर्व प्रकारची कागदपत्रे अपलोड करावीत. जेणेकरून वाहतूक पोलिसांनी कागदपत्रे मागितल्यास ऍपमधील कागदपत्रे दाखविणे सोईस्कर होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सर्व कागदपत्रे ऍपमध्ये अपलोड करावीत, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. 

वाहनचालकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत, अथवा ऍपमध्ये अपलोड करावीत. शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोहीम सुरू ठेवत कारवाई कडक करण्यात येणार आहे. 
-विठ्ठल शेलार, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com