लोकसंख्येनुसार प्रत्येकाला हवे ते फळझाड मिळणार मोफत; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

परमाळे येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांना हवी ती फळझाडे लावून देण्यात आली आहेत. ग्रामस्थांनीही उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी आषाढीला मला पुन्हा बोलवा आणि जगवलेली झाडे दाखवा, झाडांचा वाढदिवस साजरा करा, असे भोसले यांनी स्पष्ट केले. 

सातारा : झाडे जगली पाहिजेत आणि पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे, यासाठी कर्तव्य सोशल गुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी आम्ही हवी ती झाडे तुमच्या जागेत लावून देऊ. तुम्ही ती जगवा आणि त्या झाडांचे मालक व्हा आणि फळे चाखा, हा अभिनव उपकम सुरू केला आहे. या अंतर्गत परमाळे (ता. सातारा) येथे माणसी एक अशी 650 फळझाडांची लागवड करण्यात आली.
 
कर्तव्य सोशल ग्रुपच्या या पायलट प्रोजेक्‍टचा गेल्या वर्षी शेळकेवाडी येथून प्रारंभ झाला होता. परमाळे हे या उपक्रमातील पाचवे गाव आहे. कर्तव्य सोशल ग्रुपने गावातील लोकसंख्येनुसार प्रत्येकाला हवे ते झाड मोफत दिले. यामध्ये कलमी आंबा, चिकू, पेरू, नारळ आदी फळ झाडांचा समावेश आहे. वेदांतिकाराजे भोसले, शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष बाजीराव कदम, अशोक कदम, सरपंच सुमन कदम, उपसरपंच जयसिंग कदम, हणमंत कदम, संपतराव कदम, आनंद कदम, रामदास कदम, संतोष कदम, शुभांगी कदम, वैजयंता कदम, वैष्णवी कदम, वाघजाई माता सांस्कृतिक मंडळ, गणेशोत्सव क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी झाडे लावण्यात आली. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले, तसेच सर्वांनी मास्क परिधान केला होता. 
कार्यकमाच्या सुरुवातीला भोसले यांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. 

इनकमिंगने वाढतोय पाटणचा कोरोना रेट, गावागावांत सापडताहेत मुंबई व पुण्यातून आलेले रुग्ण

पुढच्या वर्षी बोलवा 

परमाळे येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांना हवी ती फळझाडे लावून देण्यात आली आहेत. ग्रामस्थांनीही उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी आषाढीला मला पुन्हा बोलवा आणि जगवलेली झाडे दाखवा, झाडांचा वाढदिवस साजरा करा, असे भोसले यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Tree Plantation By Kartvya Social Group In Parmale Village Satara