फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरणार

phaltan
phaltan
Updated on

फलटण शहर (जि. सातारा) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर त्वरित नेमणुका होण्यासाठी आमदार दीपक चव्हाण यांनी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्त पदांवर त्वरित नेमणुका करण्याबाबत आदेश संबंधित विभागात दिले आहेत. 

फलटण शहरासह तालुक्‍यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व पदे भरलेली असावीत व कोरोनाच्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार आमदार चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून तेथे असणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली. त्या वेळी रुग्णालयात विविध रिक्त पदे असल्याचे निदर्शनास आले. ही रिक्त पदे त्वरित मंजूर व्हावीत, अशी मागणी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आमदारांकडे केली. या रुग्णालयात लॅब टेक्‍निशियन, ईसीजी टेक्‍निशियन, एक्‍स रे टेक्‍निशियन, जीएनएम, वॉर्ड बॉय, पब्लिक रिलेशन ऑफिसरसह विविध पदे रिक्त आहेत. 

आमदारांनीही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमोर ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील सर्व पदांवर तातडीने नेमणुका करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागात दिले आहेत. 

दरम्यान, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन सिलिंडर वेळेमध्ये भरून देण्यात यावेत व ऑक्‍सिजन सिलिंडरचा जादा साठा फलटण येथे करून ठेवावा, अशी मागणीही आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याबाबतही कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

संपादन ः संजय साळुंखे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Aditya Lalage selected for India Hockey World Cup squad
Kas Lake overflow tourist safety Satara
Nitin Gadkari Acknowledges Highway Issues; Commuters Seek Accountability
Historic Botanical Discovery: Endemic Orchid Found for the First Time in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com