राज्य सरकार गरिबांऐवजी धनदांडग्यांचा विचार करीत आहे. ही बाब दुर्दैवी असून, याबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन करून प्रांताधिकाऱ्यांनी शहरातील दारूची दुकाने तत्काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
फलटण शहर (जि.सातारा) : शहरात दारूविक्रीस दिलेल्या परवानगीमुळे गुन्हेगारी व कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढला असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआगोदर शहरातील दारूची दुकाने बंद करावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शासनाने दारू दुकाने सुरू करून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. यामुळे गोरगरिबांच्या घरात चुली पेटण्याऐवजी भांडणे पेटत आहेत. दारूसाठी तळीराम कोरोना संसर्गाचा विचार न करता गर्दी करीत आहेत. आपल्या कुटुंबीयांची सुरक्षितता धोक्यात घालत आहेत, तसेच पैशाची चणचण असल्याने तळीराम मंडळी अनेकांकडे पैसे मागण्यास जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराने कोरोना विषाणूंचा संसर्ग फैलावला, तर त्याची जबाबदारी शासन घेणार का? असा सवालही व्यक्त करण्यात आला आहे. दारू उत्पादकांच्या आर्थिक फायद्यासाठीच दारू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकार गरिबांऐवजी धनदांडग्यांचा विचार करीत आहे. ही बाब दुर्दैवी असून, याबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन करून प्रांताधिकाऱ्यांनी शहरातील दारूची दुकाने तत्काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
जावयानं लावला सासरवाडीच्या जिवाला घोर