esakal | भाजप प्रदेशाध्यक्षांकडून "कृष्णा'ला व्हेंटिलेटर
sakal

बोलून बातमी शोधा

karad

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संवेदना फाउंडेशनतर्फे कृष्णा हॉस्पिटलला पाच व्हेंटिलेटर मशिन देण्यात आल्या. 

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून "कृष्णा'ला व्हेंटिलेटर

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या अन्‌ कोविडसाठी लागणाऱ्या व्हेंटिलेटरचा तुटवडा लक्षात घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संवेदना फाउंडेशनतर्फे कृष्णा हॉस्पिटलला पाच व्हेंटिलेटर मशिन देण्यात आल्या. 

या नव्या व्हेंटिलेटर मशिनचा लाभ कोरोनाग्रस्त रुग्णांना होणार आहे. तालुक्‍यात रुग्णालयांतील सर्वच बेड फुल्ल आहेत. ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना अडचणींशी सामना करावा लागत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत कृष्णा हॉस्पिटलला पाच व्हेंटिलेटर मशिन दिल्या. त्यांच्या संवेदना फाउंडेशनतर्फे हॉस्पिटल प्रशासनाकडे पाच व्हेंटिलेटर मशिन सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, पर्चेस अधिकारी राजेंद्र संदे, कार्यालयीन अधीक्षक तुषार कदम, डॉ. व्ही. सी. पाटील उपस्थित होते. 

संपादन ः संजय साळुंखे 
 

साताऱ्यात एक हजारावर गावांना कोरोनाचा विळखा 

loading image