

NCP to Regain Stronghold in Satara, Says District President Balasaheb Patil
Sakal
सातारा : खासदार शरद पवार यांनी दिलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यावर विशेष भर असेल. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढताना पक्षाच्या विचारांचे जास्तीतजास्त उमेदवार दिले जातील. यातून जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीमय करण्यावर आमचा भर असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.