PSI सोबत ६ महिने संपर्क नाही, बनकरशी त्याचदिवशी वाद; रात्रभर फोटो अन् मेसेज पाठवले; चाकणकर यांनी दिली माहिती

Women Doctor Death Case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली असून अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
New Twist in Women Doctor Case Argument With Banker Exposed

New Twist in Women Doctor Case Argument With Banker Exposed

Esakal

Updated on

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर आता राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलीय. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फलटण उपजिल्हा रुग्णालयात पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महिला डॉक्टरच्या आत्महत्येबाबत मोठे खुलासे केले आहेत. पोलीस आणि महिला डॉक्टर यांनी एकमेकांविरोधात तक्रार केली होती. त्यांचे एकमेकांवर काही आरोप होते. चौकशी समितीही यासाठी नेमण्यात आली होती अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. पीएसआय बदने याच्याशी मार्चनंतर महिला डॉक्टरचा संवाद नव्हता. तर घटनेच्या दिवशी प्रशांत बनकर याच्याशी फोटो काढण्यावरून वाद झाल्याचं आणि तिने आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवल्याचंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com