

Satara Female Doctor Case CCTV Reveals Hotel Stay Mystery Before Death
Esakal
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये गळफास घेत मृत्यूला कवटाळलं होतं. ती हॉटेलवर का गेली? कधी गेली? याबाबत आता नवे अपडेट्स समोर आले आहेत. महिला डॉक्टरने आत्महत्येआधी हातावर पीएसआय गोपाल बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांची नावे लिहीत गंभीर आरोप केले होते. आत्महत्या केली त्या रात्री तरुणी फ्लॅटकडे गेली होती पण तिथं कुलुप लावलेलं असल्यानं हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती सूत्रांनी दिलीय.