कुस्ती मल्लविद्या महासंघ धावला युवकाला मदत

khatav
khatav
Updated on: 

पुसेगाव (जि. सातारा) ः कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या सातारा जिल्हा शाखेतर्फे वर्धनगडमधील युवकाला उपचारासाठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 

वर्धनगड येथील युवक लहू शिंदे हे जरंडेश्वर साखर कारखान्यावर कामगार आहे. दहा दिवसांपूर्वी कामावर येत असताना पावसामुळे झालेल्या निसरड्या रस्त्यावरून तो घसरून पडला. त्यात त्याच्या डोक्‍याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्‍यकता होती. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च येणार होता. लहू शिंदे यांच्या घरची परिस्थिती बेताची असून, त्यांना हा खर्च न पेलवणारा होता. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या सातारा जिल्हा शाखेचे अध्यक्ष पै. अमरभाऊ साबळे व पै. सागरभाऊ साळुंखे यांनी पुढाकार घेऊन "कुस्ती मल्लविद्या'मार्फत 25 हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश शिंदे यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला आहे. 

या वेळी पै. अमरभाऊ साबळे, जरंडेश्वर काराखान्याचे कार्यकारी संचालक श्री. जगदाळे, शेती अधिकारी श्री. पवार, वर्धनगडचे उपसरपंच अर्जुन कुंभार उपस्थित होती. कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या जिल्हा शाखेने केलेल्या मदतीचे अनेकांनी कौतुक केले. 

(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com