
सातारा : नवीन वाहनाची रिल बनविण्यासाठी मित्रांच्या मदतीने महामार्गावरील वाहने अडविल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम प्रवीण जाधव (वय २१, रा. तारळे, ता. पाटण, सध्या रा. जुना आरटीओ ऑफिस चौक), कुशल सुभाष कदम (वय २०, रा. जरंडेश्वर नाका, सदबरझार), सोहम महेश शिंदे (वय २०, रा. शिंगणापूर, ता. माण), निखिल दामोदर महांगडे (वय २७, रा. परखंदी, ता. वाई) व एका अल्पवयीन मुलावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.