युवकांनो, सावधान नोकरीच्या भूलथापांना नका फसू!
सातारा : डिजिटल इंडिया मिशनअंतर्गत विविध पदांसाठी निवड झाल्याची पत्रे पाठवून 28 हजार 200 रुपये पगाराची कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवणारी पत्रे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना आली आहेत. निवड होण्यापूर्वीचे 15 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत 11 हजार 500 रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणीही या पत्रांद्वारे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हजारो युवकांची या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने याबाबत पोलिस दलाने कृतिशील उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील अनेकांचे रोजगार गेले, तर काहींचे जाण्याच्या मार्गावर आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार व व्यावसायिकांचीही तशीच अवस्था आहे. याच अस्वस्थेचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही टोळ्यांकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता जिल्ह्यातील अनेक युवकांना कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या लेटरपॅडवर डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत नियुक्तीची पत्रे पाठविली आहेत. या पत्रांबरोबर वर्तणूक चांगली असल्याचे, कोणताही गुन्हा दाखल न झाल्याचे उमेदवारांचे स्वयंघोषणा पत्राचाही नमुना आहे. त्याचबरोबर नोकरीच्या नियम व अटी तसेच प्रशिक्षणाबाबतची माहिती देणारी तसेच डिजिटल इंडिया मिशनचा उद्देश सांगणारी पत्रेही आहेत.
पत्रानुसार डिजिटल इंडिया मिशनमध्ये शिपाई, स्वच्छता कर्मचारी, डाटा ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, प्रोसेस सर्व्हर, क्लार्क, ड्रायव्हर, कॉल ऑपरेटर अशा विविध पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. त्यासाठी आठवी ते 12 वी शिक्षणाची अपेक्षा ठेवलेली आहे. पत्र मिळालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल. तसेच 28 हजार 200 रुपये पगार मिळणार आहे. त्याचबरोबर एक मोबाईल, जिल्हा मुख्यालयातून वाहन, 15 दिवसांचे प्रशिक्षण, देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचाराची मोफत सुविधा, दर महिन्याला पगार खात्यावर जमा केला जाणार तसेच वर्षात 24 सुट्या मिळणार असल्याचे म्हटले आहे.
प्रशिक्षण कालावधीतून कोणी निम्म्यातून सोडून जाऊ नये, कोणी खोटी कागदपत्रे दिली असतील किंवा प्रशिक्षणाची माहिती बाहेरच्यांना दिल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणाआधी प्रत्येकाला 11 हजार 500 रुपये द्यावे लागणार आहेत. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना हे पैसे परत दिले जातील तसेच नियम मोडणाऱ्यांची रक्कम जप्त करण्यात येईल, असे पत्रामध्ये सांगण्यात आले आहे. नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना 24 तासांत फोन करण्यासाठी पत्रावर एक क्रमांक देण्यात आला आहे. त्या क्रमांकावरून बॅंकेच्या खात्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर तातडीने सर्व पैसे भरावे लागतील, असे सांगितले आहे. पैसे मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत उमेदवाराला ट्रेनिंग कोड मिळणार आहे. हे सांगतानाच ज्याला नोकरी नको असेल, त्याने आलेले पत्र लगेचच नष्ट करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र एका उमेदवाराने "सकाळ'ला दिले आहे. विशेष म्हणजे त्याचा एकदम बरोबर पत्ता दिल्लीस्थित व्यक्तींकडे गेलाच कसा? असा प्रश्न संबंधित उमेदवाराला पडला आहे.
अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
डिजिटल इंडिया मिशनच्या नावाने जाहिरात न देता, अर्ज न करता अशा प्रकारची नियुक्तीची पत्रे आली आहेत. त्यामुळे ती नक्कीच बोगस असणार आहेत. जिल्ह्याबरोबरच राज्यातील अनेकांना अशी पत्रे गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे त्यांना उमेदवारांचे नाव व पत्ते कोठून मिळाले, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारातून नोकरीच्या आमिषापोटी अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार
साताऱ्यातील संभाव्य दंगलीस पायबंद; चार कोयते व एक तलवार जप्त
महाविकास आघाडीतील हे मंत्री म्हणतात, पृथ्वीराज चव्हाणांचे स्वप्न पूर्ण करू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.