Karad Zilla Parishad Elections
esakal
कराड : सातारा जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान सुरु असतानाच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे (Vadgaon Haveli voting) वादवादी झाली. बोगस मतदानाच्या कारणावरुन भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वादावादी सुरु असतानाच कार्यकर्त्यांची तेथे गर्दी झाली. त्यामुळे वडगाव हवेली केंद्र परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. (Satara Zilla Parishad elections)