
संपुर्ण आयुष्यभर कमल पाेळ उर्फ बाई या तात्यांच्या सावली बनून राहिल्या. तात्यांच्या राजकीय चढ- उतारात , संघर्षात त्यांनी साथ दिली. मार्डी गटातून त्या निवडून आल्या हाेत्या.
दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यातील दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कमल सदाशिवराव पोळ ( वय 75) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पोळ या बाई नावाने सुपरिचित हाेत्या. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
माण खटाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ संदीप पोळ तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते मनोज पोळ यांच्या मातोश्री तसेच मार्डी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ तसेच गोंदवले जिल्हा परिषद गटाच्या सदस्य भारती पोळ यांच्या सासू होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज (सोमवार, ता.२५) सकाळी साडे नऊ वाजता मार्डी ( ता.माण) येथे होणार आहे.
डॉक्टरांची पराकाष्ठा; युवकाची टेस्टिक्युलर कर्करोगावर मात
Edited By : Siddharth Latkar