
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट, गणांची रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावेळेस आरक्षण सोडतीसाठी निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला राखीव यासाठी गट, गणांची संख्या निवडणूक आयोग निश्चित करणार आहे. आरक्षित जागांचे वाटप चक्रानुक्रमाने असणार आहे. यामध्ये ज्या गट, गणात अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या जास्त असेल तेथून आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आपल्या सोयीचे आरक्षण पडावे, यासाठी इच्छुकांनी आतापासूनच देव पाण्यात घातले आहेत.