
सातारा : येथील बहुतांशी रस्त्याकडेला असणाऱ्या पदपथांवरील अतिक्रमणांमुळे ज्येष्ठांना त्याठिकाणाहून जाताना अडचणी येत होत्या. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने मोती चौकासह इतर भागातील रस्त्यांकडेच्या पदपथांवरील अतिक्रमणे हटविली. हटवलेली अतिक्रमणे पुन्हा त्याचठिकाणी होणार नाहीत, यासाठीच्या उपाययोजना पालिकेने राबवणे आवश्यक आहे.