
सातारा: राज्यात विविध ठिकाणी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली, तसेच शासनाने यंदाचा निधी पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा. जनतेनेही माणुसकीच्या भावनेतून शक्य असेल ती मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत करावी, असे आवाहन खासदार भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.