

Three new galleries coming up at the Shivaji Maharaj Museum in Satara to display rare Maratha-era artifacts and historical treasures.
Sakal
सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जपून नवीन पिढीसमोर आणत मोलाचे योगदान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आणखी नवीन तीन दालने शिवप्रेमींसाठी सज्ज होत आहेत. चित्र, वस्त्र व संकीर्ण यांचा समावेश असलेल्या या दालनांमध्ये सन १६०० ते १८०० च्या शतकातील ऐतिहासिक खजिना जवळून पाहता येणार आहे. हे दालन येत्या महिनाभरात सुरू होणार आहे.