
-अमर वांगडे
सातारा: गुगलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. या कंपनीत मिळणाऱ्या पॅकेजची अनेकदा चर्चाही होत असते. आताही चर्चा आहे ती सोहम घोलपची. सोहमला नुकतीच गुगल कंपनीमध्ये संभाषणात्मक एआय सल्लागारपदी नोकरी मिळाली. वार्षिक ४० लाखांचं पॅकेजही त्याला गुगलने देऊ केले आहे. तो गजवडी (ता. सातारा) ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीचा माजी विद्यार्थी आहे.