esakal | लस संपल्याने कालेत पुन्हा लसीकरण बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

लस संपल्याने कालेत पुन्हा लसीकरण बंद

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

काले (जि. सातारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लस संपल्याने लसीकरण पुन्हा बंद पडले. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रातून आजअखेर सुमारे तीन हजार नागरिकांनी लस घेतली आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व कर्मचारी विशेष काळजी घेत आहेत. 13 मार्च आरोग्य केंद्रास दोन हजार 500 कोविड लस उपलब्ध झाल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून लसीकरण सुरू असते. लसीकरणास परिसरातील नागरिक येत आहेत. आरोग्य केंद्रातील जागा लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना कमी पडू लागल्याने केंद्राच्या बाहेरील बाजूस सावलीसाठी मंडप घालण्यात आला आहे.

नियमांचे सर्व पालन करून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मागील शुक्रवारी अडीच हजार लसीकरण टप्पा पूर्ण झाल्यावर येथील लस संपल्याने ते बंद करण्यात आले. मात्र, अनेकांना लशीअभावी घरी परतवे लागले. त्यानंतर रविवारीच 500 लसीकरणाची डोस उपब्धतेनुसार पुन्हा लसीकरणाच्या वेग आला. नागरिकांना लस उपलब्ध झाल्याचे कळल्याने नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी आरोग्य केंद्रांत गर्दी केली. मात्र, मलकापूरसाठी दोनशे, कालेसाठी दोनशे व नांदलापूरसाठी शंभर असे पाचशे डोस उपलब्ध झाले होते. आज सकाळी हे डोस संपल्याने पुन्हा लसीकरण मोहीम बंद झाली.

मार्च महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरू असून, तीन हजार लशीचे डोस उपलब्धतेनुसार सर्व लसीकरण आज पूर्ण झाले आहे. लसीकरण केलेल्या नागरिकांची मास्क वापरणे गरजेचे आहे. लस उपलब्ध झाल्यास पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल.

-डॉ. राजेंद्र यादव, वैद्यकीय अधिकारी, काले, प्राथमिक आरोग्य केंद्र

loading image