सातारा : शाहूपुरीचा पाणीप्रश्न सुटल्याचे समाधान : शिवेंद्रसिंहराजे भोसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water problem
सातारा : शाहूपुरीचा पाणीप्रश्न सुटल्याचे समाधान : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : शाहूपुरीचा पाणीप्रश्न सुटल्याचे समाधान : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : निवडणूक जवळ आली, की अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही. हेच लोक(people) मग राजकीय स्‍वार्थासाठी जनतेबद्दल खोटा कळवळा आणत मोठमोठ्या थापा मारतात. मात्र, जनता सुज्ञ झाली असून, भूलथापांना भुलण्‍याचे दिवस गेले आहेत. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत निधी उपलब्‍ध करून दिल्‍यानेच शाहूपुरीचा पाणीप्रश्‍‍न(water problem) सुटल्‍याचे आपल्‍याला समाधान असल्‍याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. ‍ त्यांच्या उपस्‍थितीत आज कण्‍हेर योजनेच्‍या माध्‍यमातून शाहूपुरीत आलेल्‍या पाण्‍याचे पूजन करण्‍यात आले.

हेही वाचा: कऱ्हाड : घुशी पकडण्याच्या पिंजऱ्यात अडकलं उदमांजर

पाणी पूजनानंतर पाच जलकुंभ सुवासिनींना देत शिवेंद्रसिंहराजे यांनी योजनेचे लोकार्पण झाल्‍याची घोषणा केली. या वेळी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, नीलम देशमुख, माधवी शेटे, माजी उपसरपंच विकास देशमुख, विजय गार्डे, विश्‍‍वतेज बालुगडे यांच्‍यासह शाहूपुरीवासीय उपस्‍थित होते.(satara news)

हेही वाचा: आता शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार Good Touch-Bad Touch चे प्रशिक्षण

शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘कण्हेर धरण बांधकामावेळी (कै.) भाऊसाहेब महाराजांनी सातारा शहर आणि परिसराची भविष्‍यातील गरज ओळखून धरणातील पाणीसाठ्यात स्‍वतंत्र तांत्रिक तरतूद करत त्‍यासाठीची बांधणी केली होती. त्‍यांच्‍या दूरदृष्‍टीमुळेच पाणी योजना मार्गी लागली. या योजनेसाठी मी तत्‍कालीन पाणीपुरवठामंत्री दिलीप सोपल यांच्‍याकडे पाठपुरावा केला होता. यामुळे लोकवर्गणीची अट रद्द होऊन योजनेला गती आली. यानंतर योजनेसाठी अतिरिक्‍त १२ कोटींचा निधी विद्यमान उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडून मी मंजूर करून आणला. माझ्‍यासह सर्व सहकाऱ्यांनी केलेल्‍या एकत्रित प्रयत्‍नांमुळेच कण्‍हेर योजनेचे पाणी आज शाहूपुरीत आले असून, त्‍याचा मला अभिमान आहे.’’

काम न करता विरोधक आमच्‍यावर खोटे आरोप करत असल्‍याचे सांगत निवडणूक काळात साताऱ्यात तळ ठोकून असणाऱ्यांना नंतर साडेचार वर्षे हुडकायची वेळ जनतेवर येते, अशा शब्‍दात खासदार उदयनराजेंवर टीका केली. यानंतर भारत भोसले यांनी दूषित पाण्‍यामुळे दहा वर्षांपूर्वी मृत झालेल्‍या गर्भवती महिलेच्या‍ स्‍मृतीस योजना समर्पित करत असल्‍याचे जाहीर केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satarawater
loading image
go to top