

ढेबेवाडी : डोंगरातील माणूस स्वाभिमानी आणि चिवट आहे. कितीही दमदाट्या झाल्या असल्या, तरी आपण काही पाकिस्तानातून आलेलो नाही. आरेला कारे म्हणण्याची ताकद आपल्यातही आहे, असा इशारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला. म्हाईंगडेवाडी (जिंती, ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील अध्यक्षस्थानी होते.