

Adani Hatao Tarale Khore Bachao Campaign Sayaji Shinde Protests Against Tarli Project in Sahyadri and Files Police Complaint
sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव, निसर्गाच्या सान्निध्यात जगणारा शेतकरी आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली पर्यावरणाची श्रीमंती... असं सारं विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणार असेल, तर आपण गप्प बसायचं नाही, असा निर्धार करत अभिनेते सयाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद पाटील यांनी आज तारळी धरण परिसरात ‘अदानी हटाव, तारळे खोरे बचाव’चा नारा दिला.