
सातारा : शिष्यवृत्ती परीक्षेत येथील महाराजा सयाजीराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयाच्या २५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये विद्यालयातील दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये (आठवी) विद्यालयाचे २३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत, अशी माहिती प्राचार्य डी. बी. दाभाडे यांनी दिली.