जांभुळणी फाट्यावर डंपरच्या धडकेत शाळकरी मुलं गंभीर जखमी

म्हसवड पोलीस ठाण्यात घटनोची नोंद झाली
accident
accidentsakal

कुकुडवाड - गंगोती, ता. माण येथील जांभुळणी फाट्यावर म्हसवडवरून भरदाव वाळूचा भरून येणारा डंपर (MH 11 AL 04845) याने देवापूर येथे शाळेला जाणाऱ्या शाळकरी मुलाच्या मोटार सायकल (MH 42 N 5201) टु व्हिलर ला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सामोरा समोर धडक बसल्याने मोटार सायकल वरील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

यामध्ये समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासो चव्हाण, सुधिर शामराव शिंदे यातील जखमी झाले आहेत. यातील समाधान राधाप्पा नरळे हा जास्त सिरिअस असल्याने त्याला अकलूज येथे पुढील उपचारास पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित दोघांना म्हसवड येथील संचित हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे आणि कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com