दहावीतील विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या लिपिकाला दहा वर्षे सक्तमजुरी

दहावीतील विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत अनैसर्गिक अत्याचार
School clerk sentenced 10 years hard labor atrocity 10 standard student
School clerk sentenced 10 years hard labor atrocity 10 standard studentsakal

सातारा : दहावीतील विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या लिपिकाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. रामदास पोपट गाडे (वय ३३) असे शिक्षा मिळालेल्या लिपिकाचे नाव आहे. ऑगस्ट २०१६ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ही घटना घडली.

याबाबत पीडित मुलाने तक्रार दिली होती. लिपिक गाडे याने अधिकाराचा गैरवापर करत पीडित विद्यार्थ्याला काम आहे, असे म्हणून बोलावून घेतले. ‘तू जर माझ्याबरोबर आला नाहीस तर तुला नापास करेन, तसेच तुझे शाळेतील मुलीशी प्रेमसंबंध आहेत, अशी तुझी बदनामी करीन’ अशी धमकी त्याने त्याला दिली होती. बदनामी होईल, या भीतीने पीडित विद्यार्थी गाडे सांगेल तसे करू लागला. त्याचाच गैरफायदा घेत गाडेने त्याला वेळोवेळी एका बंगल्यात नेले.

तेथे मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. वर्षभर वेळोवेळी अत्याचार झाल्याने तो घाबरून गेला होता. पीडित विद्यार्थी फारसा कोणाशी बोलत नव्हता. त्रास जास्त होऊ लागल्याने त्याने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाला घेऊन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी व सहायक सरकारी वकील नितीन मुके यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश पटणी यांनी गाडे याला शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना पोलिस प्रॉसिक्युशन स्कॉडच्या पथकाने मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com