
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सीमा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तिपत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात प्रदान करण्यात आले. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, महिला सेवा दल मुख्य संघटिका लक्ष्मी कळंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.