माेठी बातमी! साताऱ्यात ‘शिक्षण’ची वरिष्ठ सहाय्यक लाचप्रकरणी जाळ्यात; प्रस्ताव मंजुरीसाठी २५ हजारांची मागणी..

Satara ACB Trap: तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या २४ वर्षांच्या सेवा कालावधीची पूर्ण निवड श्रेणी प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दाखल होता. या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी आदेश काढून घेण्याच्या कारणावरून माने यांनी तक्रारदारांकडून २५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती.
Satara ACB officials caught Education Department’s senior assistant red-handed while accepting ₹25,000 bribe for proposal approval.

Satara ACB officials caught Education Department’s senior assistant red-handed while accepting ₹25,000 bribe for proposal approval.

Sakal

Updated on

सातारा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पकडले आहे. वैशाली शंकर माने (वय ४०, रा. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com