कोरोनाचा कहर वाढला; गाव सात दिवस बंद ठेवण्याचा झाला निर्णय

कोरोनाचा कहर वाढला; गाव सात दिवस बंद ठेवण्याचा झाला निर्णय

तरडगाव (जि. सातारा) : येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी बैठक घेऊन सात दिवस गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय जाहीर केला. कडक उन्हाने जिवाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे शंभर ते दीडशे पटीने रुग्णसंख्या गावात वाढत आहे. महानुभव मठ श्रीकृष्ण मंदिर येथील 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मठामध्ये 160 जण वास्तव्यास आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. सुरुवातीपासून तरडगावमध्ये रुग्णांची संख्या ही सतत होती. गेल्या 15 दिवसांमध्ये तरडगावमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने काळजी वाढली आहे. मठातील परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, म्हणून ग्रामपंचायत सतर्क झाली असून, उपाययोजना केल्या आहेत. 

मठातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार समीर यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोरे, डॉ. अनिल कदम, ग्राम विकास अधिकारी धायगुडे, सरपंच जयश्री चव्हाण, पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. तहसीलदार यादव म्हणाले, ""परिस्थिती गंभीर असली, तरी नियंत्रणात येण्यासाठी कोरोनाचे नियम पाळावेत. गुरुवारपर्यंत तरडगावमधील दुकानदारांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.'' 

महानुभाव मठ येथे रुग्णसंख्या वाढत असून, गावातील इतर ठिकाणीही रुग्णांचे प्रमाण वाढत चालत असल्याने गावात सात दिवस कडकडीत बंद पाळावा. तरडगावमधील रुग्णांची संख्या पाहता तालुक्‍याचा आकडा आणि तरडगावचा आकडा समान असून याची गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठीच सर्व दुकानदार, पतसंस्था, बॅंका, सरकारी कार्यालय बंद राहतील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे प्रांताधिकारी जगताप यांनी सांगितले. या बैठकीस गटविकास अधिकारी अस्मिता गावडे, सरपंच जयश्री चव्हाण, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

माजी नगरसेवक कबड्डीपटू विजयसिंह उथळेंचे निधन 

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com