सात वर्षाच्या तुनजाने वडिलांना वाचवले; आजीसह भाऊ वाहून गेला

सात वर्षाच्या तुनजाने वडिलांना वाचवले; आजीसह भाऊ वाहून गेला

विंग (जि. सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी-अंबवडे येथे वांग नदीच्या पुलावरून दुचाकीवरून निघालेले एकाच कुटूंबातील चौघेजण नदी पात्रात बुडाल्याची दुर्घटना घडली. त्यातील आजी व नातावाचा बुडून मृत्यू झाला. मुलगी व तिचे वडील यांचा जीव वाचला आहे. सात वर्षाच्या पोहण्यात तरबेज असलेल्या मुलीने तिच्या वडीलांचा जीव वाचविला. शनिवारी रात्री आठच्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान घटनेमुळे येरवळे परिसरावर शोककळा पसरली आहे. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (04, दोघे रा. येरवळे) असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येरवळे येथील शरद यादव आपली आई मालन, मुलगी तनुजा व मुलगा पियुष यांना घेवून शनिवारी अंबवडे येथे देवदर्शनास गेले होते. दर्शन आटोपून ते परतत होते. त्यावेळी अंबवडे कोळेवाडी येथे वांग नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. वांग नदीच्या जुन्या पुलाचे काम सुरू आहे. तेथे बांधकामाचे साहित्यासह खडी पसरली आहे. त्याच खडीवरून दुचाकी घसरली. ती दुचाकी चाैघांना घेवून थेट नदी पात्रात बुडाली. यादव यांची कन्या तनुजा सात वर्षाची आहे. ती पोहण्यात तरबेज आहे. तिने सर्वांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आजी व भावाला ती वाचवू शकली नाही.

गला फाडनेसे गीधड कभी शेर नहीं बनता 

शरद पवारांशी पाऊण तासाच्या चर्चेनंतर उदयसिंह पडले बाहेर 

वडील शरद यांना तिने सुखरूप बाहेर काढले. नजीकच बंधारा असल्याने नदीची पाणी पातळी खोल होती. त्यामुळे आजी मालनसह तनुजाचा भाऊ पियुष पाण्यात बुडाल्याने त्यांना वाचविता आले नाही. दुर्घटनेमुळे येरवळेसह विभागातील गावात शोककळा पसरली आहे. त्याबाबतची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या नोंदी व अन्य माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com