Satara Crime: 'जाधववाडीतील लॉजमधून तीन महिलांची सुटका'; फलटण तालुक्यात उडाली खळबळ, स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
Sex Trafficking Suspected: लॉज चालक प्रवीण पवार हा देह विक्री व्यवसायासाठी महिलांना ग्राहकांसमोर सादर करत होता, तसेच त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशांवर स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण पवार याला ताब्यात घेत फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
LCB raids lodge in Jadhavwadi, rescues 3 women; human trafficking suspectedsakal
फलटण : जाधववाडी (ता. फलटण) येथील एका लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी लॉज चालकाला अटक करण्यात आली आहे. प्रवीण रंगराव पवार (रा. विडणी, ता. फलटण) असे संशयिताचे नाव आहे.