
शाहूनगर : गेल्या दोन महिन्यांपासून शाहूनगरमध्ये पाण्याची ओरड सुरू असल्याने नागरिक हैराण झाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात शाहूनगरवासीयांचा मोर्चा काढून कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांना घेराव घालून त्यांच्या पुढे तक्रारींचा पाढा वाचला. याबाबत ॲड. सचिन तिरोडकर, जय सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.