ताेंडावर ऍसिड टाकण्याची साता-यातील युवतीस धमकी; युवकास अटक

उमेश बांबरे
Tuesday, 29 September 2020

माझ्यासोबत लग्न केले नाहीस, तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर ऍसिड टाकतो, बघतो तुझ्या बरोबर कोण लग्न करतंय ते, अशी धमकी त्याने युवकाने युवतीला दिली.

सातारा : प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकी दिल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम बाळकृष्ण निपाणे (रा. महादरे, ता. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
 
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 27 वर्षीय युवती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या दहा वर्षांपासून विक्रम निपाणे हा युवतीचा पाठलाग करत होता. तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, अशी तो युवतीला गळ घालत होता. मात्र, संबंधित युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला.

नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस 

त्यामुळे चिडलेल्या निपाणे याने तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस, तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर ऍसिड टाकतो, बघतो तुझ्या बरोबर कोण लग्न करतंय ते, अशी धमकी त्याने त्या युवतीला दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची दखल घेऊन संशयित युवकाला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम अधिक तपास करत आहेत.

पोलिसांच्या टेबलवर डोके आपटून वाईत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

संपादन : संजय शिंदे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahupuri Police Arrested Youth Satara News