

Mayani Farmers Intensify Protest Against Shaktipeeth Highway Vow To Protect Land And Plan March To Prantadhikari Office
sakal
मायणी : येथून जाणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरुद्धच्या राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी मायणी-शिंदेवाडा येथे पडली. जिल्ह्यात प्रथमच शक्तिपीठ महामार्गास विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीची नुकतीच संघर्ष सभा पार पडली. या सभेत महामार्गाला एक इंचही जमीन न देण्याचा महिला व शेतकऱ्यांनी एकमुखाने निर्धार व्यक्त केला.