

All-Party Leaders Attend Final Rites of Shalinitai Patil
Sakal
सातारारोड : माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर येथील वसना नदीकाठी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, त्यांच्या जाण्याने जिल्ह्यासह राज्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, अशा शब्दांत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.