Video पाहा : 'उदयनराजेंनी जबाबदारीने वागले पाहिजे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai Udayanraje Bhosale Trending News

वीकेंड लॉकडाउनला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्ह्यासह कऱ्हाडला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मी रात्री फिरून जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्याबरोबर साताऱ्याचा आढावा घेतला असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नमूद केले.

Video पाहा : 'उदयनराजेंनी जबाबदारीने वागले पाहिजे'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. ते लोकप्रतिनिधीही आहेत. त्यांनाही राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी असणे गरजेचे आहे. राज्य सरकार जी नियमावली ठरवेल त्याचे पालन करणे हे सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे, असे मत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खासदार भोसले यांनी रविवारी सातारा येथे केलेल्या आंदोलनावर व्यक्त केले.
 
राज्य सरकारने लावलेल्या वीकेंड लॉकडाउनची पाहणी करण्यासाठी मंत्री देसाई रविवारी कऱ्हाडला आले होते. त्यांनी कऱ्हाड शहरातील शाहू चौकातून दत्त चौकापर्यंत चालत येऊन आणि नंतर दत्त चौकातून शहराची वाहनांतून पाहणी केले. त्यानंतर ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री देसाई म्हणाले, ""खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. ते लोकप्रतिनिधीही आहेत. कोरोना कशामुळे फैलावतोय हे समजून घेणे आणि राज्य सरकार जी नियमावली ठरवेल त्याचे पालन करणे हे सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे.

मंत्री असावा तर असा! काळोखात तडफडत पडलेल्या रुग्णाला गृहराज्यमंत्र्यांचा आधार

वीकेंड लॉकडाउनला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्ह्यासह कऱ्हाडला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मी रात्री फिरून जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्याबरोबर साताऱ्याचा आढावा घेतला. राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन होत आहे. दिवसभरात दोन वेळा विशेष पोलिस महानिरीक्षकांडून राज्यातील विविध विभागांचा आढावा घेतला आहे. कोणत्याही विभागात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्वत्र तंतोतंत पालन करण्यात आले आहे.''

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या काेराेनावरील वक्तव्याचा शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला समाजार, काय म्हणाले राजे वाचा सविस्तर

उदयनराजेंची भाषा याेग्य नाही

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top